Ad will apear here
Next
आपण तयार आहोत का उपकरणांशी संवाद साधायला?
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मुळे येत्या काळात सगळी उपकरणे स्मार्ट होणार आहेत. ती ‘वाय-फाय’ने जोडलेली असतील, एकमेकांशी संवाद साधतील आणि आपले जीवन सुखकर करतील. आपण त्यांच्याशी संवाद साधायला तयार आहोत का? ‘इंटरनेट - यत्र तत्र सर्वत्र’मध्ये आज यावर एक नजर...
.........
रात्री आठ वाजता बाबांना वरणभात करून द्यायचा असतो, औषधे घायची असतात त्यांना; पण सध्या पावसाळ्यात ट्रॅफिकमुळे मला घरी पोहोचायला रोजच उशीर होतो... मला ऑफिस मधूनच कुकर सुरू करता येईल का?

जेव्हा आपण घरी नसता, तेव्हा आपल्या डोक्यात बऱ्याच वेळा विचार येत असतात. मी वॉशिंग मशीन बंद केले आहे का? मी सुरक्षा अलार्म सेट केलाय का? मुले त्यांचा गृहपाठ करत आहेत की टीव्ही बघत आहेत?

इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात ‘आयओटी’वर आधारित होम ऑटोमेशन सिस्टीमच्या माध्यमातून हे सहज हाताळता येते. त्यामुळे या सर्व चिंता आपण आरामात दूर करू शकतो. स्मार्ट होम, डोमोटिक्स, बिल्डिंग ऑटोमेशन असे विविध शब्द यासाठी वापरले जातात.

संपूर्ण जग नवीन तंत्रज्ञानासह विकसित होत आहे आणि सगळ्यांचा एकंदर कल आता ‘आयओटी’ कडे आहे. आपल्या घरात ‘होम ऑटोमेशन’ करायचे डोक्यात असेल, तर सुविधा आणि बचत या दोन प्राथमिक गोष्टींचा विचार करायला हवा. ‘आयओटी’ची व्याप्ती लक्षात घेता, आपल्याला पूर्णपणे माहिती असल्याशिवाय घरात ऑटोमेशन सिस्टीम बसवणं टाळावं. 

भविष्यात जेव्हा आपण एखाद्या प्रवासाला जाऊ, तेव्हा जणू आपल्या घरातूनच प्रवास करू. कारण घरातील झाडांना पाणी घालण्यापासून ते घरात चोर आले तर त्याविषयी अलर्ट देण्यापर्यंत कशासाठीही होम ऑटोमेशनचा वापर होऊ शकतो.

होम ऑटोमेशन सिस्टीम प्रकाश, तापमान, मनोरंजन आणि इतर उपकरणे नियंत्रित करण्यासाठी वापरली जाते. याच बरोबर प्रवेश नियंत्रण आणि अलार्म सिस्टीमसारख्या घराच्या सुरक्षिततेची साधनेदेखील यात समाविष्ट असू शकतात.

उदाहरणे

• सुरक्षिततेसाठी वाय-फाय व्हिडिओ डोअरबेल बसवता येईल.

• सुरक्षिततेसाठी दरवाजांना स्मार्ट लॉक लावता येईल.

• ठरलेल्या वेळी चालू/बंद होण्यासाठी स्मार्ट लाइट बसवता येतील.

• ऊर्जा कार्यक्षमतेसाठी म्हणजे आवश्यक तेवढीच ऊर्जा वापरली जाण्यासाठी आपल्या थर्मोस्टॅटला योग्य सूचना देता येतील.

• स्मार्ट स्मोक अँड कार्बन मोनोऑक्साइड डिटेक्टर वापरला, तर घरात कुठे आग लागली किंवा धूर झाला, तर लगेच अलार्म वाजेल.
• सिंचन प्रणालीला प्रोग्रामिंग करता येईल, जेणेकरून बागेला आवश्यक तेवढं आणि आवश्यक त्या वेळेला पाणी घालण्याची सोय होईल.

• आपली सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे स्वयंचलित असतील.

• स्मार्ट व्हॅक्युम क्लीनर वापरून आपण घरात नसतानासुद्धा घर स्वच्छ करून घेता येईल.

• आपल्या गॅरेजचा दरवाजा स्वयंचलित करता येईल, जेणेकरून गाडी दारात आली, की तो आपोआप उघडेल.

• एका उपकरणाचा वापर करून घरातील एंटरटेन्मेंटची सर्व यंत्रणा नियंत्रित करता येईल.

• होम ऑटोमेशन सिस्टीममधून वेगवेगळी उपकरणे ‘गेटवे’वर जोडली जातात.

आपल्या घरातील विजेवर चालणारे कोणतेही उपकरण आपल्या होम नेटवर्कवर आणि आपल्या आदेशानुसार वापरले जाऊ शकते. आवाज, रिमोट कंट्रोल, टॅब्लेट किंवा स्मार्टफोनद्वारे आपण त्या उपकरणांना आदेश देऊ शकतो. 

नियंत्रणासाठी वॉल-माउंट टर्मिनल्स, टॅब्लेट /डेस्कटॉप संगणक, मोबाइल फोन किंवा वेब इंटरफेस वापरला जातो. हे इंटरनेटद्वारे किंवा ऑफलाइनही वापरता येते.

फायदे :

बचत : स्मार्ट थर्मोस्टॅट आणि स्मार्ट बल्ब आपण घरी असताना आपल्या सवयी शिकून ऊर्जेची बचत करतात आणि पर्यायाने खर्चातही बचत करतात. आपण घरात नसू, त्या वेळी ती यंत्रणा बंद होते. 

सुरक्षा : स्मार्ट होम ऑटोमेशन सिस्टीम्समुळे घरात बसवलेल्या कॅमेऱ्याच्या साह्याने आपण जगात कुठेही असलो, तरी आपल्या घराच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ शकतो.

सोय : बरीच स्मार्ट गॅजेट्स एकमेकांना अनुरूप असतात. त्यामुळे आपण दरवाजा उघडल्यावर स्मार्ट लाइट चालू होणे, स्मार्ट लॉक सेट होणे यांसारख्या अनेक गोष्टी आपोआपच होतात. 

नियंत्रण : स्मार्ट होम डिव्हाइसेसमुळे घरातील बऱ्याच गोष्टींवर आपण घरात नसतानाही चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवू शकतो.

सुलभता : स्मार्ट डिव्हाइसेस घरात आरामदायी वातावरण तयार करण्यात मदत करतात. कनेक्टेड डिव्हाइसेस वापरून तापमान, प्रकाश व्यवस्था नियंत्रित करणे किंवा संगीत लावणे अशा गोष्टी जागेवरून न उठताही करता येतात. 

हे विसरू नका

• अशी यंत्रणा वापरण्याआधी तिची संपूर्ण माहिती घ्या. त्यावर तुमचे स्वतःचे संशोधन करा. केवळ ज्ञात आणि विश्वासार्ह अशी होम ऑटोमेशन सिस्टीमच खरेदी करा.

• आपल्या घरातील वायफाय कनेक्शन सुरक्षित आहे ना याची वेळोवेळी पडताळणी करा. 

• ‘वॉचडॉग’ डिव्हाइसवर गुंतवणूक करण्याचा विचार करा. त्याद्वारे आपल्या घराच्या नेटवर्कमध्ये काही नको असलेल्या क्रिया घडल्यास लक्षात येतात. कारण त्याद्वारे नेटवर्कमधील प्रत्येक डिव्हाइस स्कॅन होते. 

• वेगवेगळ्या डिव्हाइसेससाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा आणि नियमितपणे ते बदला.

मशीनने मशीनशी माझ्यासाठी केलेला एक छोटासा संवाद...

घड्याळ : ऊठ गं, सकाळचे सहा वाजलेत.

गिझर : पाणी तापलेलं आहे.

कूकिंग मशिन : ब्रेकफास्ट तयार आहे, पोहे आता एकदा होतील इतकेच राहिले आहेत. एक किलो पोहे, एक डझन केळी, १२ अंडी इत्यादी यादी मागवली आहे. तुझ्या क्रेडिट कार्डवरून पैसे भरले आहेत. 

(ऑफिससाठी मी तयार. घरातून बाहेर पडताच क्षणी सगळी इलेक्ट्रिक उपकरणे आपोआप बंद. ‘फॅन चालू आहे का किंवा चुकून मी गॅस चालू ठेवला नाही ना’ असले विचार माझ्या मनाला शिवलेही नाहीत. घरातून बाहेर पडल्यावर घर लॉकही झाले आणि मोबाइल वाजला)

मोबाइलवर मेसेज : गाडी पार्किंगमधून निघाली आहे. १० वाजून तीन मिनिटांनी गेट क्रमांक चारला पोहोचा.

तंत्रज्ञानाने खरोखरच सिद्ध केले आहे, की ते येत्या काही काळात कायापालट घडवून आणणार आहे. मग आपण तयार आहोत ना मशीनशी संवाद साधायला?

अनुष्का शेंबेकर- अनुष्का शेंबेकर
मोबाइल : ९८२२९ ९९३६६
ई-मेल : anushka19@gmail. com

(लेखिका माहिती-तंत्रज्ञान विषयातील इंजिनीअर असून, पुण्यातील ऑलिफाँट सोल्युशन्स या कंपनीच्या संस्थापक सीईओ आहेत. माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांत त्या १२हून अधिक वर्षे कार्यरत असून, या क्षेत्रातील नवे ट्रेंड्स हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)

(‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ हे सदर दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZWZCD
Similar Posts
लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये ‘आयओटी’चा वापर लघू व मध्यम उद्योग अर्थात ‘एसएमई’मध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा (आयओटी) कसा उपयोग होऊ शकतो, यावर एक नजर... ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’च्या आजच्या भागात...
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ आणि वाहने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’मुळे ऑटोमोबाइल अर्थात वाहन क्षेत्रात मोठे बदल होऊ लागले आहेत. त्यावर एक नजर ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ सदराच्या आजच्या भागात...
शिक्षण क्षेत्रात ‘आयओटी’चा उपयोग! शिक्षण क्षेत्रात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा (आयओटी) कसा उपयोग होऊ शकतो, याविषयी पाहू या ‘इंटरनेट यत्र, तत्र, सर्वत्र’ या सदराच्या आजच्या भागात...
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मुळे बदलतोय आरोग्य सेवांचा चेहरामोहरा! ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’मुळे सर्वसाधारण आरोग्य सेवा आणि आपत्कालीन आरोग्य सेवांमध्ये सकारात्मक बदल होऊ लागले आहेत. त्याविषयी पाहू या ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ सदराच्या आजच्या भागात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language